अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

June 17, 2011 1:56 PM0 commentsViews: 2

17 जून

सांगलीत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनाचे हे 9 वं वर्ष आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. जावेद पाशा हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बोलताना सांस्कृतिक राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुस्लिम धर्माविषयी मत व्यक्त केलं.

मुस्लिम हा एक चांगला धर्म आहे. पण काही वाईट तत्त्वांमुळे मुस्लिम धर्माविषयी गैरसमज निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या. हे संमेलन तीन दिवस चालणार आहे. यापुढे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार मदत करेल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिलं.

close