रिलायन्सच्या पाठिशी विरोधी पक्ष

June 17, 2011 5:35 PM0 commentsViews: 7

17 जून

मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या फायद्यासाठी सरकारचे नुकसान करण्याच्या आरोपावरुन आता विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालवले आहे. कृष्णा गोदावरीच्या खोर्‍यातून मिळणार्‍या गॅसबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि मुकेश अंबानींची कंपनीत झालेल्या करारात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल कॅगने दिला.

त्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने या गैरव्यवहाराची जबाबदारी घ्यावी अशी मागणी सीपीएमने केली आहे. तर यासंबंधी उत्तर द्यायला सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केला. पण काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे.

close