हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

June 19, 2011 10:33 AM0 commentsViews: 3

19 जून

हिंगोलीत आज एकाच तासात तब्बल 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि हिंगोली शहर व कळमनुरी परिसरात चांगला पाऊस पडला. केवळ दीड तासाच्या पावसामुळे नालेही दुथडी भरुन वाहू लागले आहे. हिंगोली तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 104 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली त्यानंतर वसमत तालुक्यात 32 मि.मी. तर कऴमनुरी 40 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासात सरासरी 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

close