पोलीस व्हॅन कोसळून 2 कॉन्स्टेबल ठार

June 19, 2011 10:51 AM0 commentsViews: 5

19 जून

पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर गेल्या 18 तासांपासून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तोच खंडाळा घाटात एक पोलीस व्हॅन डिवायडरवर आदळ्यानंतर 25 फूट खोल नाल्यात कोसळली आहे. या अपघातात दोन पोलीस कॉन्सटेबल शरद चव्हाण आणि दथरथ मोरे यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघंही ठाणे शहर पोलिसात कार्यरत होते. तर दोन जखमीना निगडी येथिल लोकमान्य हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामुळे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक धीम्यागतीनं सुरू आहे.

पुणे – मुबंई एक्प्रेस हायवेवर 18 तासांपासून ट्रॅफिक जाम झालं आहे. रस्त्यावर अनेक गाड्या बंद पडल्या आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. तर हायवेवरची एक लेन बंद करण्यात आली आहे. लोणावळ्याकडे येणार्‍या हायवेवर कोंडी झाली. तसेच जुन्या हायवेवरही वाहतूकीवर वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.

close