लातूरमध्ये प्राध्यापक दाम्पत्याची 2 मुलांसह आत्महत्या

June 19, 2011 11:04 AM0 commentsViews: 1

19 जून

लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राध्यापक असलेल्या पती पत्नीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आपल्या 2 लहान मुलांनाही ठार मारल्याचे स्पष्ट झालं आहे.

आत्महत्या करणारे कुटुंब रेनापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील राहणारे आहेत. मृतांमध्ये पती सतीश खन्दाडे, पत्नी राजेश्वरी खन्दाडे आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. हे दोघेही पती पत्नी रेनापूर येथील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक होते.

रात्री उशिरा त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी श्रेया (7) आणि वेदांत या मुलांना विष पाजून मारण्यात आले असावे असा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप कळले नाही.