गृहमंत्र्यांनी दिला राष्ट्रपतींना गुजरात विधेयक फेटाळण्याचा सल्ला

November 12, 2008 2:20 PM0 commentsViews:

12 नोव्हेंबर दिल्ली गुजरात सरकारचं दहशतवादविरोधी विधेयक फेटाळण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना दिला आहे. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यास त्याचा गैरवापर केला जाण्याची भीती शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. गुजरात विधानसभेत 2003मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातल्या मोक्का कायद्याचा अभ्यास करून हे विधेयक तयार करण्यात आलं आहे. गृहमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती हे विधेयक गुजरात सरकारला परत पाठवण्याची आणि त्यात बदल करण्याच्या सूचना करण्याची शक्यता आहे.

close