आजाराचा बाऊ न करता, जिद्दीन झाला नायब तहसीलदार

June 19, 2011 11:27 AM0 commentsViews: 16

दीप्ती राऊत, नाशिक

19 जून

सेरेब्रल पाल्सी… म्हणजे बहुविकलांगत्व… खरं तर निसर्गाने केलेल्या या अन्यायाकडे हंसराजने संधी म्हणून बघितलं. स्वत:च्या पायावरही व्यवस्थित उभा राहू न शकणारा हंसराज नायब तहसीलदार झाला आहे. नाशिकच्या हंसराजच्या जिद्दीची ही एक आगळीवेगळी कहाणी.

हंसराजच्या कुटुंबासाठी हा दिवस स्वप्नवतच आहे. सेलीब्रल पाल्सी म्हणजे बहुविकलांगत्वाचा शाप घेवून जन्माला आलेला हंसराज नायब तहसीलदार झाला. आतापर्यंत स्वीमिंगच्या माध्यमातून हंसराजने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारली होती. पण आता नायब तहसीलदाराच्या परिक्षेतही तो क्रीडा गटात राज्यात पहिला आला. तेही खुल्या गटातून.

हंसराज म्हणतो, माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. यासाठी माझ्या मित्रमंडळींच्या, कुटुंबाच्या, आईवडलांच्या सपोर्टमुळेच शक्य झालं. खरं तर यात हंसराजच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. लेक्चररशीप करणार्‍या हंसराजच्या आईने त्याच्यासाठी चांगल्या शिक्षिकाची भूमिका बजावली.

पण यासाठी त्यांनी आपली लेक्चररशीप सोडावी लागली. पण त्यांनी या गोष्टीच समाधान आहे कारण हंसराजच्या करिअरच्या वाटेवर त्या एक महत्वाची भूमिका बजावू शकल्या. हंसराजची आई उल्का पाटील म्हणतात, कॉलेजला शंभर प्रोफेसर मिळाले असते, पण याला एकच आई होती. पूर्ण प्लॅनिंगनं केलं.ऍक्सिडंटली काहीच झालं नाही.

याच प्लॅनिंगमुळे हंसराजने एवढी मजल मरली. स्वीमिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली. स्वत:च्या अपंगत्वावर मात केली आणि आता नायब तहसीदार बनून त्याला इतरांसाठी काम करायंच आहे.

यावर हंसराज म्हणतो, मला क्लास वनची परिक्षेत पास व्हायाचं आहे. मला स्वत:साठी काम करायचंय, समाजासाठी आणि विशेषत: अपंगांसाठी. कारण कितीतरी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्या मिळवून देण्याच प्रयत्न करेन.

close