विस्डम जहाजाचा मुक्काम वाढला

June 19, 2011 12:28 PM0 commentsViews: 7

19 जून

मुंबईच्या जूहू किनार्‍यावर वाळूमध्ये रुतून बसलेल्या एमव्ही विस्डम जहाजाला समुद्रात नेण्यासाठी आता पुन्हा 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. अपुर्‍या भरतीमुळे हे ऑपरेशन पुढे ढकलल्याचे समजतंय. दरम्यान, काल हेलिकॉप्टर आणि क्रेनच्या सहाय्याने हे जहाज ओढायला सुरुवात करण्यात आली होती.

पण या स्टील केबल्स मध्येच तुटल्याने हे काम थांबवावे लागले आहे. जवळपास 9 हजार टन वजनाचे हे जहाज पुन्हा समुद्रात ओढून नेण्यासाठी सिंगापूरहून स्टीम या कंपनीची टग बोट आणि क्रेन मागवण्यात आली.

पण या विस्डम जहाजाला समुद्रात खेचण्यासाठी समुद्रात येणार्‍या मोठ्या भरतीची गरज आहे. दरम्यान, जहाजाला मुंबईतील जुहू किनार्‍यावर हजारोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली. पण तिथं मुंबई पोलिसांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली नाही.

close