मराठवाड्यात दुमदुमला ‘गण गण गणात बोते’चा गजर

June 19, 2011 7:03 AM0 commentsViews: 7

19 जून

'गण गण गणात बोते'चा गजर करत आणि गजानन महाराजांचा आशिर्वाद घेत शेगावच्या गजानन महाराज पालखीचं मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोलीत दाखल झालेल्या या पालखीचे भाविकांनी उत्साहात जोरदार स्वागतं केलं. या पालखीचं हे 44वं वर्षं आहे. पालखी सोहळ्यात 700 वारकर्‍यांसह हत्ती- घोडे असाही जामानिमा आहे. विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे साडे सहाशे किमीचा प्रवास करत, 30 दिवसांनी ही पालखी पंढरपूरला पोहोचते. नरसी नामदेव, डिग्रस , कहाळे, औंढानागनाथ, परभणी ते पंढरपूर असा या पालखीचा मार्ग आहे.

close