संत निवृत्तीनाथांची पालखी संगमनेरच्या वाटेवर

June 19, 2011 1:19 PM0 commentsViews: 1

19 जून

नाशिकनंतर सिन्नरचा विसावा संपवून ज्ञानियांचे बंधू आणि ज्ञानगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज सिन्नरचा घाट पार केला. आज पालखीचा मुक्काम सिन्नर तालुक्यातल्या लोणारवाडी इथं आहे. दिंडी सोहळा जसा पुढे सरकतोय तशी वारकर्‍यांची संख्याही वाढती. सिन्नरच्या घाटात अभंग म्हणत आणि फुगड्या खेळत वारकर्‍यांनी प्रवासाचा शीण हलका केला. भगव्या पताका नाचवत विठ्ठलाच्या प्रचंड ओढीन दिंडीसोहळ्यातील वारकरी पुढं सरकत आहे. पुढच्या मुक्कामानंतर पालखी नगर जिल्ह्यात प्रवेश करेल.

close