जखमी घुबडाला मिळाले जीवदान

June 19, 2011 1:53 PM0 commentsViews: 8

19 जून

कर्जत येथे एका जखमी घुबडाचे प्राण वाचवण्यात प्राणी मित्र मनोहर पाटील यांना यश आले. कर्जत येथील मराठी शाळा क्र 1 मध्ये हे घुबड जखमी अवस्थेत पडले होते. प्राणीमित्र मनोहर पाटील यांनी या जखमी घुबडावर उपचार केले. शाळेतल्या मुलांनी या घुबडाला दगडं मारुन जखमी केलं होतं. त्यांनतर पाटील यांनी वनविभागाच्या मदतीने घुबडाला जंगलात सोडलं.

close