अशोकरावांनी झटकले हात; विलासरावांनी दिली मंजुरी !

June 20, 2011 9:35 AM0 commentsViews: 7

20 जून

आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यात त्यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवले आहे. आदर्शच्या जागेची किमत ही 25 लाखांपेक्षा जास्त असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच या जागेला मंजुरी दिल्याचे अशोक चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्र म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी न्यायालयीन आयोगासमोर आज प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. आठ पानांचं हे प्रतिज्ञापत्र आहे.

अशोक चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

अशोक चव्हाण म्हणतात, जुलै 1999 च्या जी.आर. नुसार आदर्शर् सोसायटीला परवानगी दिली गेलीे. यातल्या नागरी सदस्यांच्या मेंबरशीपशी आपला संबंध नाही. त्याचबरोबर प्रकाश पेठे मार्गाच्या रूंदीकरणाशी संबंध नसल्याचे अशोक चव्हांणानी म्हटलं आहे. त्याबाबत त्यांनी विलासरावांकडे बोट दाखवलं.

या जागेचं मूल्य 25 लाखांपेक्षा जास्त असल्याने याला मंजुरी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिली. या मंजुरीशी महसुलमंत्र्यांचा संबंध नाही असं ही अशोक चव्हाणांनी या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. आदर्शला इरादापत्र जारी झाले तेव्हा मी महसूल मंत्री नव्हतो. आणि त्यानंतर 16 महिन्यांनी आदर्शला जमीन दिली गेली असं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाणांनी तत्कालीन महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्याकडेसुद्धा बोट दाखवलं आहे. इमारतीची उंची आणि पर्यावरण खात्याच्या मंजुरीबाबत शहानिशा करण्याचे निर्देश आपण दिले होते असंही अशोक चव्हाणांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

आदर्शप्रकरणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनीदेखील आपलं प्रतिज्ञापत्र आज सादर केलं. या तिघांच्या प्रतिज्ञापत्रांची एकमेकांशी तुलना केली, तर सरकारी परवानग्यांचा घोळ कसा झाला हे स्पष्ट होतं. या माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांमधील महत्त्वाच्या बाबी..

: सुशीलकुमार शिंदे – 14 पानी प्रतिज्ञापत्र: विलासराव देशमुख – 15 पानी प्रतिज्ञापत्र: अशोक चव्हाण – 8 पानी प्रतिज्ञापत्र

: सुशीलकुमार शिंदे – आदर्शची जमीन राज्य सरकारचीच, लष्कराशी संबंध नाही: विलासराव देशमुख – जमीन राज्य सरकारचीच, लष्कर किंवा कारगिल सैनिकांसाठी आरक्षित नव्हती: अशोक चव्हाण – जमीन राज्य सरकारचीच, त्यामुळे आदर्शला देण्यात आली.

: सुशीलकुमार शिंदे – इरादापत्र आणि जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारसीवरूनच आदर्श सदस्यांच्या वाढीव यादीला मंजुरी दिली: विलासराव देशमुख – आपण फक्त स्वाक्षरी केली: अशोक चव्हाण – प्रशासकीय अधिकार्‍यांनी शिफारस केलेल्या फाईल्सनाच मंजुरी दिली

: सुशीलकुमार शिंदे – इरादापत्र आणि सर्व कागदपत्रांच्या छाननीनंतरच आदर्शला जमीन देण्यात आली: विलासराव देशमुख – आदर्श इरादापत्राच्या फाईल्सवर मीच सही केली होती की नाही, मला आठवत नाही: अशोक चव्हाण – 18 जानेवारी, 2003 ला इरादा पत्र जारी झालं. त्याआधीच आपल्याकडून महसूलमंत्रीपद काढून घेण्यात आलं

: सुशीलकुमार शिंदे – सर्व कागदपत्रांच्या छाननीनंतर जुलै 2004 मध्ये जमीन देण्याचा निर्णय झाला: विलासराव देशमुख – जागेची किंमत 25 लाखापेक्षा जास्त किंमत असेल तर संबंधित फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येते, तशी ती आपल्याकडे आली होती: अशोक चव्हाण – महसूलमंत्री म्हणून आदर्शला जागा देण्याशी आपला संबंध आला नाही

: सुशीलकुमार शिंदे – ही जमीन सीआरझेड – 2 मध्ये येत असल्याची नोंद इरादापत्रात आहे: विलासराव देशमुख – आदर्शचा भूखंड सीआरझेडमध्ये येतो, याबद्दल कल्पना नाही: अशोक चव्हाण – सीआरझेड संदर्भातील फाईल आपल्याकडे आलीच नाही

: सुशीलकुमार शिंदे – बेस्ट डेपोचा विषय आपल्या कार्यकाळात पुढे आलाच नाही: विलासराव देशमुख – एमआरटीपी कायद्याच्या कलम 37 नुसार बेस्ट डेपोची जागा आदर्शला देण्यात आली, अधिसूचना मीच काढली: अशोक चव्हाण – बेस्ट डेपोचं आरक्षण हटवण्याच्या निर्णयात आपला संबंध नाही

: सुशीलकुमार शिंदे – आपल्या कार्यकाळात कॅ.प्रकाश पेठे मार्गाची रुंदी करण्याचा विषय आला नाही: विलासराव देशमुख – कॅ.प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी झालेलीच नाही. खरंतर असा प्रस्ताव आला होता, पण तो अमान्य झाला: अशोक चव्हाण – कॅ. प्रकाश पेठे मार्गासंदर्भातील फाईल आपल्याकडे कधीच आली नाही

: सुशीलकुमार शिंदे – इरादा पत्र आणि जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारसीवरूनच आदर्शच्या सदस्यांच्या वाढीव यादीला मंजुरी दिली: विलासराव देशमुख – दोन लष्करी अधिकार्‍यांसाठी डोमिसाईल सर्टिफिकेटची अट स्वेच्छाधिकारात शिथील केली होती: अशोक चव्हाण – मी नागरी सदस्यांना आदर्शचं सदस्यत्व मिळवून दिलेलं नाही, हा आरोप चुकीचा आहे

close