कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळला

June 20, 2011 9:41 AM0 commentsViews: 7

20 जून

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी कनिमोळी हिचा तिहार कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. कनिमोळींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. जवळ जवळ दीड तास कोर्टात यासंदर्भात वाद सुरु होता. मात्र सीबीआयने आपले ठोस पुरावे सादर केले. तसेच या बाबत अधिक तपास सुरु असल्याचा दावा केल्यामुळे कोर्टाने कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, कनिमोळी यांना पुन्हा विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

close