अण्णांच्या आरोपाबद्दल चौकशी करण्याचे सोनिया गांधींचे आश्वासन

June 19, 2011 4:14 PM0 commentsViews: 1

19 जून

आपण आरएसएसचा चेहरा असल्याचा प्रचार काँग्रेस नेत्यांकडून सुरू असल्याची तक्रार अण्णा हजारेंनी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोनिया गांधींना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. आज सोनिया गांधींनी या पत्राला उत्तर दिलंय. या पत्रात सोनिया गांधी म्हणतात.

"मी दिल्लीबाहेर असल्यानं मला तुमच्या पत्राला लगेच उत्तर देता आलं नाही. पण तुम्ही केलेल्या तक्रारीबाबत मी चौकशी करेन. त्याशिवाय तुम्ही उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांबाबत यापूर्वीच 19 एप्रिल 2011 या दिवशी पाठवलेल्या पत्रात माझी मतं व्यक्त केली आहेत." – सोनिया गांधी

close