पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढून चोपले

June 20, 2011 10:16 AM0 commentsViews: 3

20 जून

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गावगुंडांनी दहशत माजवली आहे. या गुंडांचा बंदोबस्त करायचा विडा आता पोलिसांनी उचलला आहे. राजारामपुरी भागात गुंडगिरी करणार्‍यांची पोलिसांनी त्याच भागात नेऊन पोलिसी खाक्या दाखविला. रविवारी रात्री राजारामपुरी शाहु मिल कॉलनीमध्ये काही गुंडानी तलवार कोयता घेऊन दशहत माजविली.

याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना तत्काळ अटक केली. आणि ज्या भागात या गुंडांनी दहशत माजविली त्या भागातून त्यांची धिंड काढली. शहरात कुणीही अशी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असाच पोलिसी खाक्या दाखवला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला.

close