राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात – दिग्विजय सिंग

June 19, 2011 4:49 PM0 commentsViews: 6

19 जून

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी राहुलचं कौतुक केलं. गेल्या 7-8 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असल्यामुळे ते आता पंतप्रधान होऊ शकतात असं मत सिंग यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा वाढदिवस मिठाई वाटून जल्लोषात साजरा केला. लखनऊमध्ये आजचा दिवस 'किसान अधिकार दिवस' म्हणून जाहीर करण्यात आला होता. राहुल गांधी मात्र इथे उपस्थित नव्हते. तर भट्टा-परसौल गावांत आज एक खास पंचायत बैठक आयोजित करण्यात आली होती.

close