आठवले युतीत सुखी राहतील – उध्दव ठाकरे

June 19, 2011 5:00 PM0 commentsViews: 3

19 जून

आज शिवसेनेचा 45 वा वर्धापनदिन मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असल्याने या मेळाव्याविषयी उत्सुकता होती. शिवशक्ती -भीमशक्ती युती टीकणार आणि राज्यात सत्तेतही येणार असा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

तसेच आठवले यांना सुखी राहा असा टोला लावणार्‍या शरद पवारांवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. आठवले शिवसेनेसोबत सुखीच राहतील असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला. तर सेना तर खूप निघाल्या पण टिकली शिवसेनाच असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंनी लगावला.

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या रामदास आठवलेंनी शिवसेनेचा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध नव्हता असा दावाही केला. शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा गाजला तो रामदास आठवले यांच्या दिलखुलास फटकेबाजीने. आठवलेंनी यावेळी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केला. तर शिवसेनेलाही कानपिचक्या दिल्या.

close