अण्णांच्या टीममध्ये फूट नाही – संतोष हेगडे

June 19, 2011 5:21 PM0 commentsViews: 2

19 जून

लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीची उद्या दिल्लीत बैठक होत आहे. सरकार आणि नागरी समितीच्या प्रतिनिधींची ही आठवी बैठक आहे. लोकपाल विधेयकातील मसुद्यातल्या अनेक मुद्द्यावर समितीत मतभेद आहेत. या बैठकीत तरी या मुद्द्यांवर तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

तर नागरी समितीमध्ये फूट पडली नसल्याचे कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी स्पष्ट केलं. आपल्या आधीच्या भूमिकेवरुन घुमजाव करत लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीच्या बैठकीत हजर राहणार असल्याचे हेगडे यांनी स्पष्ट केलं. तसेच अण्णा हजारेंच्या उपोषणालाही आपला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. हेगडे नागरी समितीचे सदस्य आहेत.

अण्णा हजारे यांनी 16 ऑगस्टपासून उपोषण न करता भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीसाठी देशव्यापी दौरा करावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. शिवाय काही कारणांमुळे लोकपाल मसुद्याच्या पुढच्या बैठकीलाही हजर राहणार नसल्याचे म्हंटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यांमुळे नागरी समितीत फूट पडल्याचं बोललं जात होतं.

दरम्यान न्यायसंस्थेला लोकपाल बिलाच्या अधिकारकक्षेत आणण्यास सरकारचा विरोध असल्याचे लोकपाल मसुदा समितीचे सदस्य आणि मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

close