मराठीच्या मुद्यावरील सर्वपक्षीय बैठकीत भाजप गैरहजर

November 12, 2008 3:23 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव12 नोव्हेंबर, मुंबई मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीवर भाजपनं बहिष्कार घातला तर शिवसेनेच्यावतीने रामदास कदम उपस्थित होते. मराठीच्या मुद्यावर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली बैठक अपयशी ठरली होती. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या ठरावात म्हटलंय, महाराष्ट्रात अन्य प्रांतीय असुरक्षित असल्याची ओरड चुकीची आहे. महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि परंपरा कधीच संकुचित नव्हती आणि नाही. या मुद्यावर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न, हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा देणारे आहेत, असं नमूद करण्यात आलंय. बैठकीनंतर सर्वपक्षीय पक्षांचं शिष्टमंडळ राज्यपाल एस. सी. जमीर यांना भेटलं. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. या राज्यानं आतापर्यंत सगळ्यांना सामावून घेतलं आहे, असं निवेदन शिष्टमंडळानं राज्यपालांना दिलं आहे. राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्या घटना घडल्या, त्यावर योग्य कारवाई करण्यात आली आहे '.पंतप्रधान मनमोहन सिंग 29 नोव्हेंबरला मुंबई दौर्‍यावर येत आहे. त्यावेळी हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे पण त्यावेळी शिवसेना सत्ताधारी पक्षाबरोबरच असेलच, असं नाही.

close