नाशिक महापालिकेत 125 कोटींचा जकातमाफी घोटाळा

June 20, 2011 6:24 PM0 commentsViews: 1

20 जून

नाशिक महानगरपालिकेने महिन्द्रा ऍन्ड महिन्द्रा कंपनीसाठी बेकायदेशीर जकातमाफी दिल्याचे उघड झालं आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही बाब पुढे आली. महिन्द्राला आतापर्यंत नाशिक महापालिकेतर्फे दरवर्षी 25 कोटी रुपयांची जकातमाफी देण्यात आली होती.

मात्र याबाबतचा कोणताही करार गेल्या पाच वर्षात महापालिकेने महिन्द्रासोबत केलेला नाही हेही उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबद्दलच्या ठरावावर महापालिका आयुक्तांच्या संमतीची सहीसुद्धा नाही.

ही जकातमाफी गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत एकूण 125 कोटींची जकातमाफी दिल्याचे यातून पुढे आलं आहे. आता मात्र प्रशासनाला जाग आली असून महापालिकेने ही जकातमाफी रद्द करण्याचा निर्णय आज घेतला.

close