पुण्यात दोन विद्यार्थ्यांचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू

June 20, 2011 7:43 AM0 commentsViews: 2

19 जून

पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये पाचव्या वर्षात शिकणार्‍या दोन विद्यार्थांचा कॅम्पसमधील स्विमिंगपुलमध्ये बुडुन मृत्यू झाला आहे. 18 जूनच्या रात्री ही घटना घडली आहे. या स्विमिंग पुलची उंची 13 फुट आहे. रात्री उशीरा ही मुलं स्विमिंगपुलजवळ गेली असता हा अपघात घडला. 22 वर्षीय कॅडेट गौतम मिश्रा आणि 23 वर्षीय कॅडेट नरेश बंन्सल अशी या कॅडेटसची नाव आहेत. गौतम हा उत्तरप्रदेशच्या कानपूरचा तर नरेश हा पंजाबमधल्या भंटिडाचा रहिवासी आहे. या बाबतीत पोलीस आता अधिक तपास करत आहे.

close