लालबाग पूलाच्या बांधकामात हलगर्जीपणा ; लवकरच कारवाई !

June 20, 2011 3:58 PM0 commentsViews: 2

20 जून

गेल्याच आठवड्यात मोठा गाजावाजा करत पूलाचा राजा असा मान घेऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला पण पहिल्याच पावसात या पूलाचे बांधकामाचे पितळ उघडे पडले. पूलावर काही ठिकाणी खड्डे पडले होती. या खड्डे पडल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती आणि आता या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.

पुलाच्या कामाबाबतचा अहवाल आला असून यात हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच यात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अंधेरी येथील बर्फीवाला फ्लायओव्हरच्या एका लेनचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

close