स्कायवॉकचा उपयोग तपासला जाणार – मुख्यमंत्री

June 20, 2011 4:08 PM0 commentsViews: 1

20 जून

लालबागच्या पूलावरील खड्‌ड्यांच्या बातमीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेतलीच पण आयबीएन लोकमतच्या आणखी एका कॅम्पेनचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुंबईत स्कायवॉक 'हवेत' अशी मोहीम आयबीएन लोकमतने दाखवली होती. यावर आता या स्कायवॉकचा खरंच किती उपयोग होतोय ते तपासून पहावे लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील स्कायवॉकवर जवळपास सातशे कोटी रुपये खर्च करुन 36 स्काय वॉक बांधण्यात आले आहे. पण त्यांचा खरंच उपयोग होतोय का असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. तसेच याबाबतचा अहवालही मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएने मागवला आहे.

close