अमरावतीमध्ये जकात कराच्या विरोधात कडकडीत बंद

June 20, 2011 4:42 PM0 commentsViews: 1

20 जून

अमरावती शहरात टोल टॅक्स लावण्याचा निर्णयाचा तीव्र विरोध होत आहे. आज दिवसभर शहरात बंद पाळण्यात आला. व्यापारी, टॅक्सी चालक यांनी बंदला पाठिंबा दिला. तर सर्व पक्षांनी ही आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र काँग्रेस पक्ष याला अपवाद राहीला.शहरात जकात कर आणि पेट्रोल कर यांच्यावर सेझ लावला जातो.

अशात शहरातल्या 9 टोल नाक्यांवर 30 वर्षांसाठी पथकर लावला जाणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि शहरातल्या लोकांना नाहक कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या कराला शहरात तीव्र विरोध होत आहे. आज शहरात टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या. व्यापारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि जिल्हाधिकार्‍यांना निवदेनही दिलं.

close