कर्नल सावंत यांची अल्वांवर टीका

November 12, 2008 1:27 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबरविनोद तळेकरकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा दिलेला राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला आहे. काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या तिकिटांची विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या वक्तव्याबद्दल बरीच चर्चा झाली, पण पूर्वी काँग्रेस पक्षात असलेले आणि अल्वांचे कट्टर विरोधक कर्नल सुधीर सावंत यांनी मात्र अल्वांवर जोरदार टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी हाच आरोप कर्नल सावंत यांनी अल्वांवर केला होता, तेव्हा कर्नल सावंत यांची काँग्रेस पक्षातून त्यांनी हाकालपट्टी केली होती.

close