हिंगोली-वाशीम मार्गावर अपघातात 5 जण ठार

June 20, 2011 4:44 PM0 commentsViews: 15

20 जून

हिंगोली-वाशीम मार्गावर जीप आणि ट्रकच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 8 जण जखमी झाले आहे. दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. मुलाच्या साखरपुड्यासाठी राठी कुटुंबीय अमरावती शहरातून हिंगोलीला जात होते. यावेळी बासबा पाटीजवळ समोरुन येणार्‍या ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकनं राठी कुटुंबीयांच्या जीपला समोरुन धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात 4 जण जागीच ठार झाले.

close