मुंडे अजूनही आमचे नेते – खडसे

June 21, 2011 9:24 AM0 commentsViews: 2

21 जून

भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजीबद्दल मुंबईत आज बैठक पार पडली.पण भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक कुठल्याही ठरावाशिवाय संपली. या बैठकीत कुठल्याही आमदाराला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. अवघ्या पाच मिनिटात ही बैठक आटोपती घेण्यात आली. या बैठकीत फक्त एकनाथ खडसे बोलले.

गोपीनाथ मुंडे यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन खडसेंनी केलं आणि बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान तीन आमदारांनी मुंडेंची भेट घेतली. आमदार माधुरी मिसाळ, पंकजा पालवे- मुंडे आणि पाशा पटेल यांनी भेट घेतली.दरम्यान, गोपीनाथ मुंडे जर भाजपमधून बाहेर पडले तर भाजपचं मोठं नुकसान होईल असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या नागपूरकरांना वाटतंय.

close