डे हत्येप्रकरणी मुंबई पोलीस कोर्टात सादर करणार स्टेटस रिपोर्ट

June 21, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

21 जून

ज्येष्ठ पत्रकार जे.डेंच्या हत्येप्रकरणी आज मुंबई पोलीस मुंबई हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. याप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला त्याची माहिती कोर्टापुढे ठेवणार आहे. जे.डेंच्या हत्येला आज 10 दिवस होत आहे. पण अजूनही पोलिसांना मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलेलं नाही.

जे.डे यांच्या हत्येप्रकरणी हाय कोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले होते. डे यांची हत्या होऊन 10 दिवस झाल्यानंतरही पोलिसांना अजून कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पोलीस रिपोर्टमध्ये काय माहिती देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close