‘लोकपाल’ मसुदा समितीची आज शेवटची बैठक

June 21, 2011 9:59 AM0 commentsViews: 4

21 जून

लोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समितीची आज शेवटची बैठक आहे. या बैठकीतून तरी काही तोडगा निघतो का हे काही वेळातच समजेल. काल झालेल्या आठव्या बैठकीत केंद्र सरकार आणि जनप्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांनी दावा केला की 80 टक्के मुद्द्यांवर सहमती झाली.

पण आयबीएन लोकमतशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हा दावा खोडून काढला. मतभेद अजूनही कायम असल्यामुळे दोन वेगवेगळे मसुदे कॅबिनेटकडे पाठवले जातील किंवा एकाच मसुद्यात वादग्रस्त मुद्द्यांवर दोन पर्याय देऊन हा मसुदा कॅबिनेटकडे पाठवला जाईल. दरम्यान, शेवटच्या बैठकीआधी काही वेळापूर्वी पंतप्रधानांनी लोकपाल समितीतल्या मंत्र्यांची बैठक घेतली.

close