जे.डे हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा संपादक शिष्टमंडळाची मागणी

June 21, 2011 3:21 PM0 commentsViews: 6

21 जून

जे.डे हत्येप्रकरणी वर्तमानपत्र आणि वृत्त वाहिन्यांच्या संपादकांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात द हिंदूचे संपादक एन.राम, इंडियन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता, टाईम्स नाऊचे संपादक अर्णव गोस्वामी आणि आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यासह इतर न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या संपादकांचा समावेश होता.

सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही दिवस मुंबई पोलिसांना देण्यात यावे डे यांच्या हत्येबाबत ठोस पुरावे लवकरच पोलीस सादर करतील. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तर जे. डे. हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी संपादकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. पण या बैठकीला गृहमंत्री आर आर पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे संपादकांनी नाराजी व्यक्त केली.

close