कर्जतच्या 118 गावांचे सात बारा एका क्लिकवर

June 21, 2011 3:30 PM0 comments

21 जून

कर्जत तालुक्यातील 184 गावांचे सात बाराचे दस्तावेज हे संगणीकृत करण्यात आले आहे. कर्जतचे तहसीलदार जगतसिंग गिरासे यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना लँड मॅनेजमेंट या सॉफ्टवेअरची माहिती करुन दिली. मग कर्जत तालुक्यातील 28 तलाठ्यांनी पुढाकार घेउन स्वखर्चाने लॅपटॉप आणि प्रिंटर विकत घेतला.

त्याच बरोबर यांनी तालुक्याची वेबसाईट निर्माण केली. www.tahasilofficekarjat.info या वेबसाईटवर तालुक्याची सर्व माहिती अपलोड केली. लँड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरून तलाठ्यांनी दफ्तरांचा बोजा एक लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवला आहे. जो वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांनाच एका क्लिकवर मिळू शकेल.