मुंडेंचं अजूनही तळ्यात मळ्यात

June 21, 2011 11:01 AM0 commentsViews: 31

21 जून

कालपासून नॉट रिचेबल झालेले नाराज गोपीनाथ मुंडे अखेर मीडियासमोर आले.आपली पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याने त्यांच्या निर्णयानंतर राज्यातील सहकार्‍यांशी चर्चा करुन आपण पुढची दिशा ठरवणार असल्याचो मुंडेंनी स्पष्ट केलं.

तसेच आपण भाजपमध्येच असून पुढचा निर्णय झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला आपल्याला बोलावण्यात आलं नव्हतं असंही त्यांनी सांगितले.

मात्र गोपीनाथ मुंडे यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असली तरी त्यांची नाराजी कायम आहे आणि मुंडे दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.

यानंतर मुंडे यांच्या घरी पुन्हा भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पांडुरंग फुंडकर बैठकीत उपस्थित होते. पण ही बैठक सकारात्मक झाली असून लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजीबद्दल मुंबईत आज बैठक पार पडली.पण भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक कुठल्याही ठरावाशिवाय संपली. या बैठकीत कुठल्याही आमदाराला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. अवघ्या पाच मिनिटात ही बैठक आटोपती घेण्यात आली. या बैठकीत फक्त एकनाथ खडसे बोलले.

गोपीनाथ मुंडे यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन खडसेंनी केलं आणि बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान तीन आमदारांनी मुंडेंची भेट घेतली. आमदार माधुरी मिसाळ, पंकजा पालवे- मुंडे आणि पाशा पटेल यांनी भेट घेतली.

इतर बातम्या

मुंडे अजूनही आमचे नेते – खडसे मुंडेंना काँग्रेसचा हात ?

close