बारामतीत शहर बससेवा सुरू

June 21, 2011 3:40 PM0 commentsViews: 4

21 जून

बारामती शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळाने 10 मिनी बस सुरु केल्या आहेत. बारामती शहरातील भिगवण रस्ता मोठ्या वाहनांमुळे धोकादायक बनला होता. याच रस्त्यावर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दर 10 मिनिटाला 32 आसनी मिनी बस सोडल्या जाणार आहेत. याचा शुभारंभ प्रांतधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.त्यामुळे एमआयडीसीमधे येणार्‍या – जाणार्‍या नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि तिथल्या अवैध प्रवासी वाहतुकीलाही आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते.

close