कोल्हापुरात निलंबित पोलीस हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

June 21, 2011 3:46 PM0 commentsViews: 1

21 जून

कोल्हापूर कळंबा कारागृहामधील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने आज पोलीस मुख्यालयासमोर रॉकेल ओतून घेवुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कळंबा कारागृहातल्या बिल्हाणी कांबळे या कॉन्स्टेबलला गुन्हेगारांशी संबध असल्याच्या कारणावरुन गेल्या काही महिन्यापूर्वी निलंबित केलं होतं. त्यामुळे तो व्यथीत झाला होता. त्याचबरोबर आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी आज पोलीस मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

close