चित्रकार तय्यब मेहतांची कलाकृती 5.75 कोटीला विकली

June 21, 2011 12:18 PM0 commentsViews: 7

21 जून

सुप्रसिद्ध चित्रकार तय्यब मेहता यांच्या चित्रानं जागतिक स्तरावर एका विक्रमाची नोंद केली आहे. त्यांनी 1998 साली चितारलेली काली ही कलाकृती तब्बल पाच कोटी बहात्तर लाखांना विकली गेली आहे. काली या त्यांच्या सीरिजमधील हे एक चित्र आहे.

नवी दिल्लीत सॅफर्न आर्ट जंक्शनमधे झालेल्या लिलावात हे चित्र अंदाजे सव्वा ते पावणे दोन कोटीपर्यंत विकले जाईल असा अंदाज होता. बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट मुव्हमेंटमधे योगदान असलेल्या एम.एफ.हुसेन, एफ.एन.सुझा, एस.एच.रझा यांच्या शैलीचा त्यांच्या चित्रांवर प्रभाव होता. तय्यब मेहता यांच्या चित्रांमधे नेहमीच हिंदू देवी देवतांचा समावेश होता. याआधी 9 जूनला रिक्षापुलर या चित्राची 14 कोटीला विक्री झाली होती.

close