विम्बल्डन स्पर्धेत पहिल्या फेरीत सानिया पराभूत

June 21, 2011 3:57 PM0 commentsViews: 2

21 जून

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला सिंगल्सच्या पहिल्या राऊंडमध्ये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पराभूत झाली आहे. फ्रान्सच्या व्हर्जिन राझानोने सानियाचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.

मॅचमध्ये चांगली सुरूवात करून सानियाने आघाडी घेतली मात्र टाय ब्रेकरमध्ये संधीचा फायदा तिला घेता आला नाही आणि पहिला सेट तिला गमवावा लागला. दुसर्‍या सेटमध्ये तिला पुनरागमन करता आलं मात्र तिसर्‍या सेटमध्ये तिला कोणतीच संधी मिळाली नाही.

आता डबल्समध्ये सानियाच्या आशा टीकून आहेत. रशियाची एलिना व्हेसनिना ही तिची पार्टनर असणार आहे आणि त्या दोघी रँकिकमध्ये चौथ्या स्थानावर आहेत.

close