पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण

June 21, 2011 12:24 PM0 commentsViews: 16

21 जून

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा एक मुक्काम यावर्षी पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. या वाढीव मुक्कामासह तुकाराम महाराजांचा पालखी रिंगण सोहळ्याचा अनुभव यावेळे पिंपरी चिंचवडकरांनाआणि पुणेकरांना अनुभवता येणार आहे. वारीतली रिंगण ही प्रामुख्याने पुणे, सोलापूरच्या ग्रामीण भागात ही रिंगण होणार आहे.

प्रथमच आता शहरी भागात हे रिंगण होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगरमध्ये 24 जून रोजी पालखीचा मुक्काम होणार आहे. यावेळी महाराजांच्या पालखीचं गोलं रिंगण होणार आहे. ही माहिती योगेश बहल यांनी दिली.

पहिल्यांदाच होणार्‍या या रिंगणाची उत्सुकता सर्वांना आहे. त्यासाठी लागणारी सगळी तयारी आणि पिपरी चिंचवड महापालिका सज्ज असल्याचे योगेश बहल यांनी सांगितलं. बेलवाडी इदापूर अकलूज आणि वाखरी असं रिंगण होणार आहे.

close