मुंडेंचं काँग्रेसमध्ये स्वागत करेन – नारायण राणे

June 21, 2011 2:19 PM0 commentsViews: 12

21 जून

नाराज गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं मी स्वागतच करेन असं मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. उद्योगखात्याच्या आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये आले असता नारायण राणेंना मुंडेच्या काँग्रेसप्रवेशाविषयी विचारल्यावर त्यांनी आपल्या मित्राच्या कोणत्याही निर्णयाला मी पाठिंबा देईल असं ही म्हटलं.

भाजपचे नाराज नेते गोपीनाथ मुंडे गेल्या दिवसांपासून कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली येथे आपल्या पक्षश्रेष्ठींना भेट घेण्याअगोदर महाराष्ट्र भेठी गाठींचा धडाका लावला होता. याच काळात मुंडे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आले होते. आज दिवसभर घडत असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असता नारायण राणे यांनी मत व्यक्त करून एक प्रकारे चर्चेला दुजोरा दिला

close