मुंडे गेले तरी महायुती भक्कम !

June 22, 2011 8:48 AM0 commentsViews: 5

22 जून

नाराज गोपीनाथ मुंडे प्रकरणावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर प्रतिक्रिया दिली. मुंडेंनी भाजप सोडलं तरी पक्षावर काहीच परिणाम होणार नाही, असं मत बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंडे शिवशक्ती-भीमशक्ती शिल्पकार आहेत, हा मतप्रवाह त्यांनी खोडून काढला.

आणि त्यांच्या जाण्याने शिवशक्ती-भीमशक्तीवर सुद्धा कोणताच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेल्याने आणि नारायण राणेंना काढून टाकल्यामुळे शिवसेनेवर काय परिणाम झाला असा सवाल त्यांनी विचारला.

सध्या कुणाचं कुणाशी बिनसतंय, कुणाचं कुणाशी जमतंय,हे कळत नाही. राजकारणाचं बॉलिवूड झालंय, असा टोला त्यांनी लगावला. मुंडेंची नाराजी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण त्यात पडण्याचं कारण नाही. मुंडेंनी स्वतःहून सल्ला मागितला तरच आपण देऊ असं बाळासाहेब म्हणाले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनावरही टीका केली. अण्णांच्या आंदोलनाला पैसा आला कुठून, कॉर्पोरेटच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोप बाळासाहेबांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच अण्णा-बाबांचं फावलं अशी टीकाही त्यांनी केली.

close