कंपनी अंतर्गत खर्चाचंही पुर्ननियोजन करा- टाटा

November 12, 2008 3:49 PM0 commentsViews: 7

12 नोव्हेंबर रतन टाटांसारख्या मोठ्या उद्योगपतीलाही मंदीमुळे उद्भवलेल्या आर्थिक समस्यांशी दोन हात करावे लागत आहेत. कॉस्ट कटिंगच्या या काळात आर्थिक समस्यांवर मात कशी करावी याबाबत रतन टाटांनी स्वत: पुढाकार घेतलाय. त्यांनी टाटा ग्रुपमधल्या 96 चीफ एक्झिक्युटिव्हजना सहा निर्देश दिलेत. योजना कशा आखाव्यात याबाबत टाटांनी सल्ला दिला आहे. भांडवल वाढवताना आणि खर्च करतानाही विचार करावा असं सांगितलंय. कंपनी अंतर्गत होणा-या खर्चाचंही पुर्ननियोजन करावं असं टाटांनी लिहीलंय. तसंच कंपनीचे पैसे अगदी जपून वापरण्यासाठी पण त्यांनी निर्देश दिले.

close