अभिषेक बच्चन होणार ‘पा’ तर बिग बी ग्रँड ‘पा’

June 22, 2011 11:54 AM0 commentsViews: 7

22 जून

अमिताभ बच्चन एकदमच खूश आहे. आपण आजोबा बनणार असल्याचं त्यानं ट्विटरवर म्हटलंय. ऐश्वर्या राय आता आई बनणार आहे. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं. तेव्हापासून सगळ्यांना दोघांना कधी बाळ होतेय, याची उत्सुकता होती. यावर अनेक चर्चाही सुरू होत्या. आता ट्विटरवर खुद्द बिग बी यांनी बातमी..बातमी..बातमी मी आजोबा होणार आहे. आपली सून ऐश्वर्या आई होणार आहे असं टिवट केलं आहे. आपण खूश असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. सध्या ऐश्वर्या 'हिरॉइन' या सिनेमात बिझी आहे.

close