तरुणीवर चाकूने वार करुन त्याने 5 व्या मजल्यावरून उडी मारली

June 22, 2011 1:45 PM0 commentsViews: 3

22 जून

पुण्यातील हडपसर भागात आज बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास एका तरूणाने तरूणीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. यानंतर त्याने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारली. हडपसरच्या ससाणेनगर भागात ही खळबळजनक घटना घडली.

अंकुश इंगलवार असं या तरू णाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला. तर तरूणीला हडपसरच्या खाजगी रूग्णालयात हलवण्यात आलं. हल्लेखोर तरूण हा या तरूणीचा मामेभाऊ आहे. पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी तातडीन घटनास्थळाला भेट दिली. या हल्ल्यामागच्या नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहे.

close