नालासोपारामध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

June 22, 2011 1:50 PM0 commentsViews: 1

22 जून

मुंबईच्या नालासोपारामध्ये एका आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ऍड. सी. पी. सिंग असं त्यांचं नाव आहे. रस्त्याच्या कामात झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती त्यांनी मिळवली होती आणि यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यांना अलायन्स हॉस्पिटलमध्ये सिंग यांना दाखल करण्यात आलं आहे. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आत्माराम पाटील यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सिंग यांनी केला.

close