धुळे महापालिकेत भ्रष्टाचार लपवण्यासाठीच लावली आग

June 22, 2011 2:58 PM0 commentsViews: 3

22 जून

धुळ्यात महापालिकेच्या वसुली विभागात आग लावण्यात आली होती. आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठीच ही आग लावण्यात आली होती अशी कबुली महापालिकेच्याच एका कर्मचार्‍याने दिली आहे. भालचंद्र खराटे असं या कर्मचार्‍याचे नाव असून तो आता माफीचा साक्षीदार झाला आहे. सर्व कर्मचार्‍यांनी मिळून ही आग लावल्याची कबुली ही खराटे याने दिली. यासाठी या कर्मचार्‍यांनी रफिउद्दीन शफिउद्दीन शेख ऊर्फ गुड्डू या गुंडाला आग लावण्यासाठी सुपारी दिली होती.

close