लाचखोर अधिकार्‍याच्या प्रस्तावावरून महापौरांवर टांगती तलवार

June 22, 2011 3:06 PM0 commentsViews: 4

22 जून

कल्याणडोंबिवली महापालिकेतून निलंबित केलेले लाचखोर सुनील जोशींना परत घेण्याच्या प्रस्तावावरून शिवसेनेच्या महापालिका नेत्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. महापालिका सभागृह नेते अरविंद मोरे आणि गटनेते अरविंद पोटे या दोघांनाही पद सोडण्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आदेश दिले. तर कडोंमपाच्या महापौर वैजयंती घोलप यांच्यावरही टांगती तलवार आहे. येत्या दोन दिवसांत घोलप यांच्याबद्दल निर्णय होणार असल्याचं समजतंय. कल्याण विभागाचे संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सुनील जोशी याला परत घेण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला होता.

close