‘लोकपाल’साठी उपोषणावर ठाम – अण्णा हजारे

June 23, 2011 11:00 AM0 commentsViews: 1

23 जून

लोकपाल विधेयकाबद्दलची सरकार आणि नागरी समितीमधील शेवटीची बैठक आटोपून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राज्यात परतले. पुणे विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. लोकपाल विधेयकाबाबत सरकार आपली आणि जनतेची फसवणूक करत आहे. सरकारच्या असं वागण्याच्या विरोधात आपण 16 ऑगस्टपासून उपोषण करणार आहोत. आणि त्याशिवाय पर्याय नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार यावेळी अण्णांनी आएबीएन लोकमतकडे केलं.

close