कुरार हत्याकांडातला मुख्य आरोपी गजाआड

June 23, 2011 11:49 AM0 commentsViews: 5

23 जून

कुरार व्हिलेज हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उदय पाठक याला अखेर अटक करण्यात आली. क्राईम ब्रांचने पाठकला काल वाराणासीतून अटक केली. कुरारमध्ये चार तरुणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या 8 आरोपींना याआधीच अटक झाली. पण मुख्य आरोपी उदय पाठक पोलिसांना सापडत नव्हता.

अखेर 17 दिवसांनंतर उदय पाठकला अटक करण्यात क्राईम ब्रांचला यश आलं. उदय पाठक हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत 16 गुन्हे दाखल आहेत. यात एक हत्या, एक हाफ मर्डर याशिवाय खंडणी वसूली, धमकावणे आणि फसवणुकीसारखे गुन्हेही दाखल आहेत. त्याला चार वेळा तडीपारही करण्यात आले आहे. कुरार हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आणि विशेष वकील नेमण्याची मागणी क्राईम ब्रांच करणार आहे.

close