नाशकात डिग्री विकणार्‍या संस्थेची तोडफोड

June 23, 2011 9:05 AM0 commentsViews:

23 जून

नाशिकमध्ये 28 हजारांमध्ये एमबीएची डिग्री विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऍपेक्स या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार होत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार जितेंद्र आव्हाड फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजरोडवरील या इन्स्टिट्यूटच्या ऑफिसची तोडफोड केली. यात मुख्य सूत्रधार प्रतिक कापडिया फरार असल्याचे उपस्थित सहसहकार्‍याने सांगितले. मात्र या सहसहकार्‍यानंही विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची तक्रार करत कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं.

close