खरिपाच्या तोंडावर अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे शेतकरी अडचणी

June 23, 2011 1:00 PM0 commentsViews: 91

23 जून

हिंगोलीत अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे खरिपाच्या तोंडावर अडचणी वाढू लागल्या आहे. बाजारपेठेत खत आणि बी बियाण्यांची टंचाई असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही हिंगोलीत खतांची मोठी टंचाई निर्माण झाली. गेल्या वर्षी कमी खत पुरवठा झाल्याने पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये मोठी धुमष्चक्री झाली होती. त्यामुळे यंदा कृषी खात्याने वाढीव मागणी नोंदवली होती.

मात्र कृषीखात्याने बफर स्टॉकचे 24 हजार मेट्रिक टनांचे नियोजन असताना केवळ आठ हजार मेट्रीक टनचं बफर स्टॉक केला. कृषी खात्याच्या फसलेल्या नियोजनाचा फटका शेतकर्‍यांना बसतोय. बाजारपेठेत खताची टंचाई निर्माण झालीय तर व्यापारी चढ्या दराने खतविक्री करताहेत. त्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

close