कल्याणमध्ये सामुहिक बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

June 23, 2011 10:05 AM0 commentsViews: 4

23 जून

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी अखेर पोलिसांनी 36 तासानंतर दोघांना अटक केली आहे. अनिल पाठक आणि जमीर खान अशी या दोघांची नावं आहेत. तिसरा आरोपी फरार आहे. या दोन आरोपींना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यातील जमीर कान याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत. तर अनिल पाठक हा लोकलमध्ये वस्तु विकण्याचे काम करतो. पुण्याहून दादर-चेन्नई एक्स्प्रेसने कल्याण स्टेशनला आलेली ही तरुणी आपल्या मित्रासोबत घरी निघाली असताना प्लॅटफॉर्म नंबर एक बाहेर त्यांना तिघांनी अडवलं आणि शस्त्राचा धाक दाखवून त्या मुलीवर सामुहिक बलात्कार केला होता.

close